Wednesday, February 9, 2022

डोंबिवली, कल्याण पूर्व व उल्हासनगरच्या काही भागात शुक्रवारी वीज पुरवठा बंद

महापारेषणकडून शुक्रवारी (११ फेब्रुवारी) सकाळी ८ ते दुपारी १ दरम्यान २२० केव्ही पडघा ते पाल आणि २२० केव्ही पडघा ते जांभूळ या अतिउच्चदाब वाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे डोंबिवली, उल्हासनगर दोन आणि कल्याण पूर्व विभागातील महावितरणच्या काही ग्राहकांची वीज काही काळ बंद राहणार आहे. यासंदर्भात वीज ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश पाठवून पूर्वकल्पना देण्यात येणार असून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

डोंबिवली पश्चिमेतील पुढील भागांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते दुपारी १ दरम्यान बंद राहणार आहे. गरिबाचा पाडा व नवापाडा फिडर, तुकारामनगर फिडरवरील नव चेतन, सुदंरा कॉम्प्लेक्स, लक्ष्मण रेषा, मल्हार बंगलो, गावदेवी मंदिर, अंबरयोग, आयरेगावचा, सावरकर रोड, गोपाल नगर, गल्ली नंबर १ आणि २, पेंडसेनगर, टिळकनगर, पोस्ट ऑफिस चौक, आरपी रोड, संत नामदेव पथ, वसंतवाडी, चार रस्ता, गोपालनगर २, ३ व ४, जिजाई नगर, अंबिका नगर, गोग्रासवाडी, पाथर्ली रोड, शिखंडेवाडी, स्टार कॉलनी, मानपाडा रोड, आर अँड टी कॉलनी, संत समर्थ मठ, हनुमान मंदिर रोड, गांधीनगर, जुनी डोंबिवली, कोपर रोड.

कल्याण पूर्व विभागातील पुढील भागांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत बंद राहील – नांदिवली, सांदप, भोपर, उसरघर, देसलेपाडा, सोनारपाडा, मानपाडा, ललीतकाटा, लोढा हेवन, कटाई, निळजे परिसर, हेदुटणे, घेसर, उंभर्ली, कोळे, घारीवली, भंडारी पाडा, वैभव नगरी, मिलापनगर, सुदर्शन नगर, एमआयडीसी रहिवासी परिसर, सागाव खालचा पाडा व वरचा पाडा, चेरा नगर, शंखेश्वर नगर, भगवान पाटील व सुरेश पाटील कंपाऊंड, म्हात्रे नगर, तुकाराम वाडी, पाटील महाविद्यालय परिसर, रिजंन्सी, दावडी गाव, शंकरनगर, हॉरिझॉन मायसिटी व कासारिओ तसेच कासाबेला बिल्डिंग परिसर, मंगरुळ, उसटणे, उसटणे इंडस्ट्रिज पार्क, नऱ्हेन, पाली, चिरड, वाडी, करवले, पालेगाव, चिंचवणी, खोणी, काकडवाल, नेवाळी, नेवाडी पाडा, खरड, कुंभार्ली, पोसरी, शेलारपाडा, ढोका, कोळसेवाडी, म्हसोबा चौक, सिद्धार्थ नगर, मच्छी मार्केट, प्रभू राम नगर, जिम्मी बाग, शाहू गार्डन, लोकग्राम, लोकवाटिका, लोकधारा, नेतीवली नाका, मराठी शाळा, पुणे लिंक रोड, चिकनी पाडा, तिसगाव, शिवाजी कॉलनी, विजयनगर, विशालनगरी, घारडा केमिकल कंपनी, बीएआरसी, पलावा.

उल्हासनगर दोन विभागात पुढील भागात सकाळी ८ ते दुपारी १ दरम्यान वीजपुरवठा बंद राहणार आहे – प्रेमनगर, हिरापुरी, शहा मार्केट, दशहरा मैदान, ओंकारानंद आश्रम, निजधाम, तहसिलदार दुधनाका, कैलास कॉलनी, वंसतबहार, समतानगर, गायकवाड पाडा एक व दोन, आकाश कॉलनी एक, कोळेकर पाडा, दूर्गा पाडा, आकाश किराणा, जेमनानी कंपाऊंड, शांतीप्रकाश आश्रम, साई आर्केड, ओटी सेक्शन, कुर्ला कँप रोड, श्रीराम नगर, एकता नगर, आकाश कॉलनी, बारा नंगर बस स्टॉप, मानेरा, व्हिनस, संभाजी नगर, लालचक्की, गजानन नगर, कुर्ला कँप, आशेळे पाडा, आशेळे गाव, गणपत नगर, नेताजी पाणीपुरवठा, उल्हासनगर चार व पाच विभाग, बारकू पाडा, रिलायन्स, पालेगाव, अंबरनाथ एफ टाईप एमआयडीसी विभाग, इंडस्ट्रियल भाग, अतिरिक्त अंबरनाथ औद्योगिक क्षेत्र, आनंदनगर एमआयडीसी.

The post डोंबिवली, कल्याण पूर्व व उल्हासनगरच्या काही भागात शुक्रवारी वीज पुरवठा बंद appeared first on Loksatta.



from वृत्तान्त – Loksatta https://ift.tt/YZP6vw7
via IFTTT

Tuesday, January 4, 2022

मुंबई उपनगरीय लोकल सेवेवर निर्बध घालण्याबाबत अद्याप निर्णय नाही

राज्यात दैनंदिन करोना बाधितांचा आकडा वाढत आहे, खास करुन मुंबई महानगर भागात दैनंदिन करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत करोना बाधितांचा वेग हा सर्वात जास्त आहे. यामुळे मुंबई महानगरपालिका असेल किंवा मुंबई महानगर भागातील प्रशासकीय व्यवस्थेत चिंतेचे वातावरण पसरले आहे. करोना बाधित रुग्णांच्या संख्येचा विस्फोट झाला तर पुन्हा एकदा आरोग्य सेवेवर मोठा ताण पडणार आहे. यामुळेच टाळेबंदीची – निर्बंधांची वेळ येऊ नये यासाठी आत्ताच सावधगिरीचा इशारा द्यायला सुरुवात झाली आहे.

असं असलं तरी मुंबई महानगरात धावणाऱ्या, मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल सेवेबाबत मात्र अजुनही कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. मुंबईत करोना बाधित रुग्ण जरी वाढत असले तरी लोकलबाबतचा निर्णय हा विविध महानगरपालिकांशी संबंधित आहे, तेव्हा याबाबत राज्य सरकारलाच निर्णय घ्यावा लागणार आहे.

“…तर मात्र केंद्राच्या नियमानुसार मुंबईत लॉकडाउन ” ; महापौर किशोरी पेडणेकर यांचा सूचक इशारा!

सध्या मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल मधून दररोज सुमारे ३० लाखापर्यंत तर मध्य रेल्वे मार्गावर ३६ लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत आहेत. याआधी फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच लोकल प्रवासाला परवानगी देण्यात आली होती, लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यावर ही बंधने काढून टाकण्यात आली आहेत. यामुळे पूर्वीच्या सरासरी पेक्षा प्रवासी संख्या जरी कमी असली तरी मुंबईत लोकल प्रवास हा आता नेहमीसारखा गर्दीचा झालेला आहे. तेव्हा अशी ही लोकल सेवा हे एक करोनाच्या प्रचाराचे मुख्य साधन ठरू शकते.

मुंबईत तूर्त टाळेबंदी नाही ! ; पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भूमिका

त्यामुळेच मुंबई शहरातील करोना बांधितांची संख्या लक्षात वाढत असतांना पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची वेळ येऊ नये, खास करुन लोकल प्रवासाबाबत पुन्हा निर्बंध घालण्याची वेळ येऊ नये यासाठी करोना संबंधित नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. तेव्हा पुढील काही दिवसांत मुंबई शहरातील, मुंबई महानगर भागातील करोना बांधितांच्या संख्येवर लोकल प्रवासाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

The post मुंबई उपनगरीय लोकल सेवेवर निर्बध घालण्याबाबत अद्याप निर्णय नाही appeared first on Loksatta.



from वृत्तान्त – Loksatta https://ift.tt/3FVFnxE
via IFTTT

Tuesday, November 23, 2021

मुंबईकरांसाठी खुशखबर : आता UTS अ‍ॅपवरुन तिकीट, पास काढता येणार

मुंबई आणि परिसरातून लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. आज मध्यरात्रीपासून Unreserved Ticketing System – UTS या अ‍ॅपच्या माध्यमातून लोकल प्रवासासाठी तिकीट आणि पास उपलब्ध होणार आहे. करोनाची लाट सुरु झाल्यावर सर्वसमान्यांच्या लोकल प्रवासावर बंधने आणण्यात आली होती. यामध्ये UTS अ‍ॅपमधून तिकीट आणि पास मिळण्याची सेवा सुद्धा बंद करण्यात आली होती. अखेर ही सेवा पुन्हा सुरु करण्यात येत आहे.

रेल्वेने UTS अ‍ॅप हे युनिवर्सल पासशी लिंक केलं आहे. लशीचे दोन डोस होत १४ दिवस पुर्ण झालेल्या नागरीकांनाच युनिवर्सल पास राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिला जातो. तेव्हा आता रेल्वे स्टेशनवरील तिकीट काऊंटवर जाण्याऐवजी मोबाईवरच लोकल ट्रेनसाठी तिकीट आणि पास काढणे शक्य होणार आहे. उद्यापासून ही सुविधा सुरु होणार आहे असं मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी स्पष्ट केलं आहे.

ऑगस्ट महिन्यापासून लसीकरण झालेल्या लोकांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली होती. असं असलं तरी गर्दी टाळण्यासाठी तिकीट सुविधा सुरु करण्यात आली नव्हती. यामुळे सर्वसामान्य लोकांनी याबद्द्ल संताप व्यक्त केला होता. त्यानंतर युनिवर्सल पास असलेल्यांना तिकीट सुविधा सुरु करण्याचा निर्णय ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आला. असं असलं तरी तिकीट काऊंटवर गर्दी वाढत होती, ही गर्दी कमी करण्यासाठी आता UTS अ‍ॅपच्या माध्यमातून तिकीट आणि पास उपलब्ध करुन देण्याची सुविधा सुरु करण्यात येत आहे.

मुंबई आणि परिसरात पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मार्गावर दररोज एकुण ८० लाखांपेक्षा जास्त प्रवासी हे लोकल ट्रेनने प्रवास करतात. यापैकी १० टक्के प्रवासी हे UTS अ‍ॅपचा वापर करतात असा अंदाज आहे.

The post मुंबईकरांसाठी खुशखबर : आता UTS अ‍ॅपवरुन तिकीट, पास काढता येणार appeared first on Loksatta.



from वृत्तान्त – Loksatta https://ift.tt/3xdYlw6
via IFTTT

Wednesday, October 27, 2021

कलानींचा पुन्हा दलबदल; सर्व समर्थकांच्या पक्षांतरामुळे उल्हासनगरमध्ये कलाटणी

|| सागर नरेकर-नीलेश पानमंद

सर्व समर्थकांच्या पक्षांतरामुळे उल्हासनगरमध्ये कलाटणी; राष्ट्रवादीपासून सुरू झालेला प्रवास पुन्हा राष्ट्रवादीत

ठाणे : महापालिकेतील सत्तेत समान वाटा, विधानसभेचे तिकीट, महापौरपदाच्या आश्वासनावर पाच वर्षांपूर्वी भाजपच्या तंबूत शिरलेल्या उल्हासनगरच्या पप्पू कलानी समर्थक टीम ओमी कलानीने राज्यात महाआघाडीचे सरकार येताच महापौर निवडणुकीत शिवसेनेला साथ दिली. भाजपला तोंडावर पाडल्याच्या मोबदल्यात बंडखोर कलानी गटाच्या एकाही नगरसेवकावर अपात्रतेची कारवाई होऊ न देण्याचा शब्द पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाळला. त्यापाठोपाठ गेल्या काही दिवसांपासून भाजपशी जवळीक निर्माण झाल्याचे चित्र उभे करून अखेर कलानी गटाने राष्ट्रवादी काँग्रेसची साथ धरली. 

राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत भाजप, रिपाइं आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षातील कलानी समर्थक २१ नगरसेवक, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यात पप्पू कलानी यांची मुलगी सीमा कलानी यांचाही समावेश होता. पप्पू कलानी यांची सून आणि ओमी कलानी यांची पत्नी पंचम कलानी यांना राष्ट्रवादीने उल्हासनगर जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे बहाल केली. त्यासाठी राष्ट्रवादीने गुप्तपणे हालचाली केल्या. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी मध्यरात्री उशिरा कलानी महल गाठले, त्याच वेळी हा पक्षप्रवेश निश्चित झाला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी उल्हासनगरचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरकिरण कौर धामी यांना सरचिटणीसपदी बढती देण्यात आली आणि त्या जागी पंचम कलानी यांची बुधवारी नियुक्ती करण्यात आली.

कलानी गटाचा प्रवास

पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घेऊन टीम ओमी कलानी गटाची स्थापना.

त्यानंतरच्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक. त्या जोरावर पालिकेत प्रथमच भाजपचा महापौर.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ज्योती कलानी यांना तिकीट नाकारल्यापासून टीम ओमी कलानीत अस्वस्थता.

२०१९ च्या अखेरीस झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत टीम ओमी कलानी गटाच्या नऊ नगरसेवकांचे बंडखोरी करत शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान. स्थायी समितीसह अन्य विषय समित्यांच्या निवडणुकीतही भाजपचा पाडाव करण्याचे प्रयत्न.

बंडखोर नगरसेवकांना अपात्र ठरण्यापासून वाचवण्यात शिवसेनेने मोठी भूमिका बजावल्याची चर्चा.

काही दिवसांपूर्वी पप्पू कलानी यांना भाजपचे पक्षप्रवेशासाठी निमंत्रण. त्यावरून चर्चा सुरू असतानाच कलानी समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.

गणेश नाईकांनाही आणखी धक्का?

नवी मुंबई महापालिकेची निवडणूकही येत्या काही महिन्यांत होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने गणेश नाईक व भाजपमधील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. ‘नवी मुंबईत यापूर्वीच अनेक धक्के दिले असून यापुढेही आणखी धक्के दिले जाणार आहे. उल्हासनगरचा पक्षप्रवेश हा ट्रेलर असून अजून चित्रपट बाकी आहे,’ असे सांगत आव्हाड यांनी त्याचे संकेत दिले.

ठाणे जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका येत्या काही महिन्यांत होणार असून या निवडणुका शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडी करूनच लढविणार आहेत. काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी त्यांच्या पक्षाचे नेते ‘एकला चलो रे’चा नारा देत आहेत. – जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते

काही नगरसेवक अनुपस्थित

२२ नगरसेवकांनी बुधवारी ठाण्यात  पक्षप्रवेश केला; परंतु यापैकी काही नगरसेवकांऐवजी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. याबाबत विचारले असता, ‘कायदेशीर अडचणींमुळे काही नगरसेवकांना आम्हीच येऊ नका असे सांगितले,’ असे उत्तर आव्हाड यांनी दिले. या कार्यक्रमाला ओमी कलानीदेखील अनुपस्थित होते. मात्र, ‘ते आमच्यासोबतच आहेत’, असे त्यांच्या पत्नी पंचम कलानी यांनी स्पष्ट केले.

The post कलानींचा पुन्हा दलबदल; सर्व समर्थकांच्या पक्षांतरामुळे उल्हासनगरमध्ये कलाटणी appeared first on Loksatta.



from वृत्तान्त – Loksatta https://ift.tt/3midmco
via IFTTT

Monday, September 20, 2021

पंतप्रधान जर विदेशातही हिंदीत बोलतात, तर आपल्याला का लाज वाटते? – अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी देशातील लोकांना त्यांच्या मातृभाषेसह हिंदी वापरण्याची प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन केले आणि असे म्हटले की, भारताला भाषांच्या बाबतीतही आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदी दिनानिमित्त एका मेळाव्याला संबोधित करताना हे वक्तव्य केले.“आत्मनिर्भर असणे म्हणजे केवळ देशामध्ये उत्पादन करणे नव्हे, भाषांच्या बाबतीतही आपण ‘आत्मनिर्भर’ असणे आवश्यक आहे. जर पंतप्रधान आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी बोलू शकतात, तर आम्हाला कशाबद्दल लाज वाटते? ते दिवस गेले जेव्हा हिंदीत बोलणे हा चिंतेचा विषय होता”, असंही अमित शाह म्हणाले.

गृहमंत्री पुढे म्हणाले, “भारताची प्रगती मातृभाषा आणि राजभाषेच्या समन्वयात आहे. ”


हिंदी दिवसाच्या निमित्ताने, मी सर्व देशवासियांना विनंती करतो की, मूलभूत कार्यांमध्ये त्यांच्या मातृभाषेसह हिंदी ही अधिकृत भाषांपैकी एक असलेल्या हिंदीचा उत्तरोत्तर वापर करण्याची प्रतिज्ञा घ्या. भारताची प्रगती मातृभाषा आणि राजभाषा यांच्या समन्वयात आहे. आपणा सर्वांना हिंदी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, असं शाह यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

शाह पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार हिंदी आणि इतर भारतीय भाषांच्या समांतर विकासासाठी वचनबद्ध आहे. भावना व्यक्त करण्यासाठी भाषा हे सर्वात शक्तिशाली माध्यम आहे. आपल्या सांस्कृतिक चेतनेचा आणि राष्ट्रीय एकतेचा आधार असण्याव्यतिरिक्त, हिंदी प्राचीन सभ्यता आणि आधुनिकता आणि प्रगती यांच्यातील सेतू म्हणूनही काम करते. मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही हिंदी आणि इतर सर्व भारतीय भाषांचा समांतर विकासासाठी सातत्याने वचनबद्ध आहोत”, असं शाह यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हिंदी दिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की हिंदीला एक जोमदार भाषा बनवण्यासाठी विविध क्षेत्रांतील लोकांनी उल्लेखनीय भूमिका बजावली आहे.

The post पंतप्रधान जर विदेशातही हिंदीत बोलतात, तर आपल्याला का लाज वाटते? – अमित शाह appeared first on Loksatta.



from वृत्तान्त – Loksatta https://ift.tt/2ZfHSKX
via IFTTT

Tuesday, September 14, 2021

पंतप्रधान जर विदेशातही हिंदीत बोलतात, तर आपल्याला का लाज वाटते? – अमित शाह

"भारताची प्रगती मातृभाषा आणि राजभाषेच्या समन्वयात आहे '', असंही गृहमंत्री म्हणाले.

from Loksattaवृत्तान्त – Loksatta https://ift.tt/3nwAXXG
via IFTTT

Friday, May 14, 2021

‘प्राणवायू निर्मितीसाठी सहकार, उद्योग क्षेत्राने पुढे यावे’

कळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यातील प्राणवायू प्रकल्पाचे शनिवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पध्दतीने उद्घाटन करण्यात आले.

from Loksattaवृत्तान्त – Loksatta https://ift.tt/3ePhCfP
via IFTTT